पडळकरांवर सचिन अहिरराव भडकले आणि म्हणाले ,”हिमालयाला बांडगुळाने शिकवावं?”

71

महाराष्ट्र, दि.२५ (पीसीबी) : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात येतोय. तर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते पडळकर यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे माजी नेते आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत गेलेले सचिन अहिर हे देखील पडळकरांवर भडकले आहेत .

“हृदय आणि आत्मा स्वच्छ ठेवून महाराष्ट्राला एका वेगळ्या ऊंचीवर नेणा-या हिमालयाला बांडगुळानं शिकवावं,” या सारखा विनोद नाही, अशी टीका सचिन अहिरराव यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे.

दरम्यान, राज्यात विविध शहरांत आज राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

 

WhatsAppShare