पक्षासाठी प्रसंगी अंगावर जाणारा लढावू वृत्तीचा कार्यकर्ता प्रमोद निसळ!

289

– भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भावना
– सर्वपक्षीय नेत्यांकडून स्व. निसळ यांना श्रद्धांजली

पिंपरी, दि. 9 (पीसीबी): पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरोधी पक्षात होता. त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी, मागण्यासाठी प्रसंगी अंगावर जाणारा आणि लाढावू वृत्तीचा कार्यकर्ता म्हणून स्वर्गीय प्रमोद निसळ यांची प्रतिमा होती, अशा भावना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या. पिंपरी-चिंचवड भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी कै. प्रमोद निसळ यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. यानिमित्त त्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी ऑनलाईन श्रद्धांजली सभा आली.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सदस्य हेमंतराव हरहरे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे नेते योगेश बहल, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, प्रदेश सचिव अमित गोरखे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर, पिंपरी चिंचवड प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, मा.नगरसेवक राजू दुर्गे, माजी महापौर राहुल जाधव, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, राजेश पिल्ले यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या की, भाजपावर निस्सिम निष्ठा असलेले कार्यकर्ते म्हणजे प्रमोद निसळ आहेत. माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या कार्यकाळापासून आम्ही निसळ यांच्यासोबत काम केले. हसतमूख राहुन काम करण्याचा आदर्श आम्हाला निसळ यांनी घालून दिला.

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे म्हणाले की, मी भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून प्रमोद निसळ यांच्यासोबत जास्त काम करण्याचा योग आला. मात्र, त्यापूर्वी निसळ आणि मी एच.ए. स्कूलमध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे. पाचवर्षे आमच्यापुढे असलेले निसळ यांना आम्ही बालपणापासून पाहत आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत निसळ बदलले नाहीत. नेहमी हसतमूख असलेले निसळ यांच्या जाण्यामुळे पक्षात त्यांची पोकळी निर्माण झाली आहे. कोरोना संकटाच्या काळात आपण सर्वजण भाजपाचे कार्यकर्ते शहरातील नागरिकांना वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. पण, आपण स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, कोरोनामुळे अनेक जवळची माणसे आपल्याला सोडून गेली आहेत. आपण सर्वजण सार्वजनिक जीवन जगत असताना आपली काळजी घेतली पाहिजे. निसळ यांच्या कुटुंबातील कर्ता माणूस गेला आहे. निसळ कुटुंबियांना आपण धीर दिला पाहिजे आणि मदत केली पाहिजे.

राष्ट्रवादीचे नेते योगेश बहल म्हणाले की, प्रमोद निसळ हे अत्यंत जीवळचे मित्र होते. आम्ही गेल्या ३४ वर्षांपासून एकत्र काम करीत आहोत. राजकीय मतभेद असले तरी एक व्यक्ती म्हणून प्रमोद निसळ चांगला माणूस होता. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे म्हणाल्या की, गेल्या २५ वर्षांपासून प्रमोद निसळ आणि आम्ही एकत्र काम करीत होतो. त्यांच्या रुपाने पक्षांने निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे.

स्व. अंकुशराव लांडगे यांच्या नावाने ट्रस्ट…
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा रुजवण्याचे काम कै. अंकुशराव लांडगे यांनी केले आहे. त्यामुळे भाजपाच्या कार्यक्तर्यांना केवळ मदत करण्यासाठी कै. अंकुशराव लांडगे यांच्या नावाने ट्रस्ट तात्काळ चालू करावी. भाजपासाठी काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मदत होईल, असे पहावे. या ट्रस्टच्या माध्यमातून पहिली मदत ही निसळ कुटुंबियांना झाली पाहिजे, अशा सूचना यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.

WhatsAppShare