पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांची गय नाही; राहुल गांधींचा सुचक इशारा

573

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – यापुढे पक्षासाठी मेहनत करणाऱ्यांना योग्य ते बक्षीस दिले जाईल. मात्र, निरर्थक बडबड करून पक्षाला अडचणीत आणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. तसेच पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांची यापुढे गय केली जाणार नाही, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी  कार्यकर्त्यांना  इशारा दिला आहे. 

राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळात आज (सोमवारी)  २३ मंत्र्यांची वर्णी लावण्यात आली. या मंत्र्यांची निवड करताना राहुल गांधी यांनी जुन्या आणि नव्यांचा समतोल साधला.  त्याचबरोबर मंत्रिमंडळातील ५ जागा जाणीवपूर्वक रिक्त ठेवल्या आहेत. यातून  राहुल गांधी यांनी  नेत्यांना  सुचक इशारा दिल्याचे मानले जात आहे.  असे राहुल गांधी यांनी सांगितले.

दरम्यान, तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस पक्षांनी चांगलीच उभारी घेतली आहे. मात्र, ही विजयी घौडदौड कायम राहण्यासाठी राहुल गांधी यांनी काही कठोर निर्णय घेतले आहेत.  राहुल यांच्या सुचनेवरूनच कर्नाटक मंत्रिमंडळातून काँग्रेस नेते रमेश जारकीहोली यांना डच्चू देण्यात आला होता. रमेश जारकीहोली मंत्रिमंडळाच्या आणि पक्षाच्या बैठकींना उपस्थित राहत नव्हते.  तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांशी त्यांची वाढती जवळीक वाढली होती. त्यामुळे त्यांची गच्छंती केल्याचे सांगितले जात आहे.

WhatsAppShare