पक्षवाढीसाठी भाजपला आयात नेत्यांची गरज; एकनाथ खडसेंचा पक्षाला घरचा आहेर

431

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – राज्य मंत्रिमंडळात जायला मला आता पूर्वीसारखा उत्साह राहिलेला नाही. पक्षाने आयात केलेल्या नेत्यांना संधी देणे सुरु  केले आहे. पक्षाच्या वाढीसाठी आयात नेत्यांची गरज पक्षाला वाटू लागली आहे, असा घरचा आहेर देत माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.   

यावेळी खडसे म्हणाले की, पक्षाने आयात नेत्यांना संधी दिली आहे. परंतु त्याच वेळेला पक्षातील जुन्या नेत्यांना डावलले आहे. आमच्या पक्षात असे अनेक नेते आहेत जे चार-पाच वेळा निवडून आलेले आहेत. तरीसुद्धा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे कार्यकर्ते दुःखी आहेत, त्यांचे दुःख सहाजिक आहे.

दरम्यान,  राज्य मंत्रिमंडळाचा आज (रविवारी) विस्तार  झाला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाजपच्या १०, शिवसेनेच्या २ तर रिपाइंच्या एका नेत्याला मंत्रीपदाची शपथ दिली. नव्या मंत्रीमंडळात सुरुवातीलाच पक्षात आलेल्या नव्या नेत्यांना प्राधान्य दिले गेले.  याबाबत  एकनाथ खडसे यांनी खदखद व्यक्त केली आहे.