पंतप्रधान मोदींना पाकिस्तानी बहिणीने बांधली राखी

143

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुळच्या पाकिस्तानी असलेल्या एका खास बहिणीने आज (रविवार) राखी बांधली. या प्रसंगामुळे भारत-पाकिस्तान या देशांतील बंधुभावाचे अनोखे दर्शन घडले.

या खास बहिणीचे नाव कमर मोसिन शेख असे आहे. ही महिला मुळची पाकिस्तानची रहिवासी आहे. गेल्या २० वर्षांपासून जेव्हा मोदी रा. स्व. संघाचे कार्यकर्ता होते तेव्हापासून कमर या मोदींना राखी बांधत आहेत. आता मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी ही राखी बांधण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

कमर म्हणाल्या की, नरेंद्र भाईंना मी गेल्या २२-२३ वर्षांपासून राखी बांधत आहे.  मोदी सध्या प्रचंड व्यस्त आहेत. मात्र, तरीही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत त्यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्याला फोन करुन रक्षा बंधनाची आठवण करुन दिली. त्यांच्या अजूनही हे लक्षात असल्याने मला आनंद झाला. त्यानंतर मी रक्षा बंधनाची तयारी केली.