पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  घेतले करुणानिधींचे अंत्यदर्शन  

104

चेन्नई, दि. ८ (पीसीबी) – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी यांच्या पार्थिवावर आज (बुधवार)  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पहाटे चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही करुणानिधींचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी मोदींना अश्रू अनावर झाले.

दरम्यान, करुणानिधी यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली आहे. द्रमुकचे राज्यभरातील कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने चेन्नईत दाखल झाले  आहेत. करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मद्रास उच्च न्या यालयाने  त्यासाठी परवानीगी दिली आहे. न्यायालयाच्या  या निर्णयाचे करुणानिधींच्या समर्थकांनी स्वागत केले आहे.

दिवंगत जयललिता यांच्याप्रमाणेच मरीना बीचवर करुणानिधींचे समाधीस्थळ व्हावे, अशी द्रमुकची इच्छा होती. पण सरकारने त्याठिकाणी जागा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे समर्थकांनी  मंगळवारी रात्रीच उच्च न्यायालयात  धाव घेतली.  आज (बुधवारी) न्यायालयाने द्रमुकच्या बाजुने निर्णय दिला. द्रमुकच्या मागणीवर करुणानिधींच्या स्मारकासाठी सरकारने आधी गांधी मंडपम येथे दोन एकर जागा देण्याची तयारी दाखवली होती.