पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आण्विक ऊर्जा मंत्रालयासह “ही” महत्त्वाची खाती ठेवली स्वतःकडे

91

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात झाली आहे. मोदींनी मंत्रिमंडळाच्या कामांचे वाटप आज केले. पंतप्रधानांशिवाय एकूण 57 खासदारांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. यात अमित शाह गृहमंत्री, राजनाथ सिंह संरक्षणमंत्री आहेत. पण अनेक अशी मंत्रालये आहेत जी कोणत्याही मंत्र्याला देण्यात आलेली नाहीत, कारण ते सर्व विभाग मोदींनी स्वत:कडेच ठेवली आहेत. जाणून घ्या कोणते खाते मोदींनी आपल्याकडेच ठेवली आहेत.