पंतप्रधान गरिब योजनेबद्दल काय म्हणाले नरेंद मोदी…. – कोरोनाचे संकट पुढचे पाच महिने कायम असणार हे भाषणातून सुचित केले

44

 

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – प्रधानमंत्री गरिब योजनेचा लाभ आता नोव्हेंबर पर्यंत कायम राहिल अशी महत्वाची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना केली. या योजनेत ५ किलो गहू किंवा ५ किलो तांदूळ मोफत देण्यात येतो आहे. गेले तीन महिने आणि पुढचे पाच महिने मिळून या योजनेसाठी सुमारे दीड लाख कोटी रुपये खर्च सरकार करत असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय वन नेशन वन रेशन कार्ड योजना त्वरीत लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पुढच्या पाच महिन्यांची तयारी सरकारने केली आहे, याचा दुसरा अर्थ किमान पाच महिने कोरोनाचे संकट कायम असणार असे प्रतप्रधान नरेंद मोदी यांनी अप्रत्यक्षपणे सुचित केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सायंकाळी चार वाजता देशातील जनतेला संबोधित केले. ते म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात कुठेही अशी परिस्थिती आली नाही की, देशातील गरिबाची चूल पेटली नाही. सर्वांनी प्रयत्न केले म्हणून एकही गरिब भुका राहिलेला नाही. वेळेत निर्णय घेतल्याने हजारो लोकांचे जीव वाचले. प्रधानमंत्री गरिब योजनात पावणे दोन लाख कोटींचे पॅकेज दिले. गेल्या तीन महिन्यांत जनधन खात्यात ३१ हजार कोटी रुपये थेट जमा केले. ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटींची मदत जमा केली. गावातील गरिबांना रोजगार मिळावा यासाठीही सरकारने प्रयत्न केले. त्यासाठी ५० हजार कोटी रुपये खर्च करत आहोत. . इतक्या मोठ्या १३० कोटींच्या देशात हे घडले याचे जगालाही आश्चर्य आहे. कोरोनाशी लढताना ८० कोटी लोकांना रेशनमध्ये ५ किलो गहू किंवा तांदूळ मोफत दिले. प्रत्येक परिवाराला १ किलो डाळ मोफत दिली. ही मदत इतकी मोठी आहे की अमेरिकेच्या लोकसंख्येच्या अडिचपट, ब्रिटनमधील लोकसंख्येच्या १२ पट आणि युरोप मधील लोकसंख्येच्या दुप्पट आहे. आज त्याहीपुढे जाऊन दुसरा महत्वाचा निर्णय जाहीर करत आहोत. आता यापुढचे दिवस सणांचे आहेत. गुरुपौणिमा, रक्षाबंधन, कृष्णजन्म, गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळी आहे. या काळात गरज आणि खर्चही वाढतो. त्यासाठी प्रधानमंत्री गरिब योजनेचा विस्तार थेट दिवाळी, छटपूजा पर्यंत म्हणजे नव्हेंबर पर्यंत करत आहोत. ८० कोटी जनतेला पुढचे पाच महिने ५ किलो गहू किंवा तांदूळ मोफत दिली जाईल. त्याशिवाय हरभरे १ किलो देणार. या योजनेसाठी ९० हजार कोटी रुपये खर्च आहे, आणि मागील तीन मिन्यांचा खर्च विचारात घेतला तर दीडलाख कोटी रुपयेंचा हा खर्च आपण करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, काही राज्यांनी खूप चांगले काम केले आहे. आता वन नेशन वन कार्ड ही योजना सुरू करत आहे. कोणी कुठेही असो त्याला धान्य मिळेल. आजवरच्या या सर्व योजनेचे श्रेय या देशातील अन्न धआन्याची कोठारे भरून देणारा शेतकरी आणि प्रामाणिक करदाता यांना जाते. त्या सर्वांना मी नमन करतो, असे मोदी म्हणाले. आपल्या निवेदनाचा समारोप करताना, येणाऱ्या काळात आणखी प्रयत्नांची गरज आहे. गरिब, पिडीत शोषित वंचीत यांच्यासाठी काम करायचे आहे. आत्मनिर्भर भारतासाठी दिवसरात्र एक होऊन काम करू. लोकल के लिये व्होकल अशी घोषणा त्यांनी पुन्हा केली. १३० कोटी देशवासियांच्या बरोबरीने काम करायचे आहे.

पुढचा काही काळ लोकांनी सुरक्षेची खबरदारी घ्या, मास्क, गमछा वापरावा, सुरक्षित अंतर ठेवा असा सल्लाही त्यांनी दिला. एका देशाच्या पंतप्रधानाला मास्क वापरला नाही म्हणून १३ हजार रुपये दंड झाल्याचे उदाहरण त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात पुढचे पाच महिन्यांचे नियोजन असल्याने किमान नोव्हेंबर पर्यंत कोरोनाचे संकट कायम असल्याचे स्पष्ट झाले.

 

WhatsAppShare