पंतप्रधान आज सायंकाळी ४ वा. काय बोलणार ?

51

नवी दिल्ली, दि.३० (पीसीबी) : पंतप्रधआन नरेंद मोदी मंगळवारी 30 जूनला देशाला संबोधित करणार आहेत. मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता मोदी देशाला संबोधित करतील. एकीकडे भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. तर दुसरीकडे भारत-चीनमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढ विरोधात काँग्रेसने जोरदार आंदोलन केले तसेच  मोदी सरकारवर चौफेर हल्ले सुरू आहेत. चीन ने आपली जमीन हडपली, सरकारच्या नरमाईमुळे चीन आतमध्ये आला त्याचे उत्तर मोदी यांनी दिले पाहिजे, अशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आग्रही भुमिका आहे. मोदी बोलत नाहीत म्हणून राहुल गांधी पुन्हा पुन्हा तोच मुद्दा रेटून मांडत आहेत. त्यामुळे या दोन्ही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी नक्की काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsAppShare