पंजाबमधील वीटभट्टी कामगाराला लागली दीड कोटींची बंपर लॉटरी!

187

संगरूर, दि. १४ (पीसीबी) – पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील एका गावात वीटभट्टीवर काम करणारा मनोज कुमार आणि त्याची पत्नी राज कौर यांना कुणी सांगितले असते की काही दिवसांत तुमचे आयुष्य आमुलाग्र पालटणार आहे तर त्यांचा विश्वासच बसला नसता. अवघे २५० रू. दिवसाला कमावणाऱ्या या दाम्पत्याचे हातावर पोट. पण २४ तासांत त्यांचे आयुष्य ३६० अशांत बदलले. कारण मनोजला चक्क दीड कोटी रूपयांची बंपर लॉटरी  लागली!

विशेष म्हणजे मनोज कुमारने हे तिकीटही उधारीवर घेतले होते. शेजाऱ्याकडून २५० रुपये घेऊन त्याने हे तिकीट विकत घेतले होते. लॉटरी जिंकल्याचे समजताच मनोज कुमारच्या घरी प्रॉपर्टी डीलर आणि बँकर्सची रांग लागली आहे.

मनोज कुमार वाल्मिकी दलित परिवारातील आहे. १० वर्षांपूर्वी त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्याची मोठी मुलगी याच वर्षी १२ वी पास झाली आहे आणि नोकरी शोधतेय. मनोज कुमारला तीन मुली आणि एक मुलगा आहे.