पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत?…संजय राऊतांचा मोठा खुलासा!

215

मुंबई,दि.२(पीसीबी) – भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसेच पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे यांच्याबद्दल १२ डिसेंबरलाच कळेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्यासमोर येणार आहे, अशी फेसबुक पोस्ट केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसेच पंकजा मुंडेंनी आपल्या ट्वीटरवरून भाजप हा शब्द हटवल्याने त्या भाजप सोडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

WhatsAppShare