न्यूझीलंडमधील मशिदीत अंदाधुंद गोळीबार; ४० जणांचा मृत्यू २० जण गंभीर

170

न्यूझीलंड, दि. १५ (पीसीबी) – न्यूझीलंडमधील मशिदीत झालेल्या अंदाधुंद गोळीबारात ४० जणांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत. ख्राईस्टचर्च येथे हा गोळीबार करण्यात आला. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला.

हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरुन पळ काढला होता. यासोबतच हल्लेखोराने लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केले होते. यानंतर अजून एका मशिदीत गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. यात तीन पुरुष एका महिलेचा समावेश आहे. ख्राईस्टचर्चच्या वेगवेगळया भागात कारमध्ये स्फोटके सापडली असून ही सर्व स्फोटके निकामी करण्यात आली आहेत अशी माहिती पोलीस प्रमुख माईक बुश यांनी दिली.