न्यु यॉर्क येथील प्राणीसंग्राहलयातील वाघिणीला कोरोनाची लागण

94

प्रतिनिधी,दि.६(पीसीबी) – अमेरीकेतील न्यु यॉर्क शहरात असलेल्या ब्रॉंक्स प्राणीसंग्राहलयातील “नादिया” वाघीणीला कोरोनाची लागण झाल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहेत. प्राणीसंग्राहलयातील केअर टेकर कडून वाधीणीला संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्याचे वृत्त काही अंतरराष्ट्रीय वृत्तांमध्ये प्रकाशीत करण्यात आले आहे.

चार वर्षीय मलयन वाधिण “नादीया” , तिची बहिण अजूल, दोन “अमुर” वाघ व तीन “आफ्रिकी सिंह“ यांना कोरडा खोकला झाला आहे. या प्राण्यांच्या आहारामध्ये देखील कमतरता झाली आहे. सावधगिरी म्हणून प्राणीसंग्रहालय प्रशासनाने वाघाची कोविड- १९ चाचणी केली असतां सदर बाब समोर आली.
अमेरीकेच्या ॲग्रीकल्चर विभागाने याबाबत माहिती देताना सांगितले की, “प्राण्यांमध्ये कोरोना वायरस चा काय परिणाम होतो ? हे अजून निश्चितपणे सांगतां येत नाही. विविध प्राण्यांमधये वायरसला वेगवेगळ्या प्रकारे परिणाम असु शकतात. प्राण्यांमध्ये कोरोनाचा काय परिणाम होतो याचे बारकाईने निरीक्षण सुरु असुन त्याचा अहवाल तयार करण्यात येत आहे.”
प्राण्यांपासून मानवाला संसर्ग होण्याचा प्रकार चायना येथील वूहान शहरात घडला आहे. पाळीव प्राण्यांना कोरोनाची लागण होऊ शकते ? किंवा त्यांच्याकडून मानवांवा संसर्ग होतो का ? हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तो पर्यंत प्राण्याशी मर्यादीत संपर्क ठेवावा असे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

WhatsAppShare