न्यायालयाचे आदेश बसवले धाब्यावर; घुसघोरी करून दहशत पसरवणं आलं अंगाशी; ४ जणांवर गुन्हा दाखल

108

हिंजवडी, दि. २८ (पीसीबी) – न्यायालयाचा मनाई आदेश असतानाही मिळकतीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बावधन येथे 22 जुलै रोजी घडली.

राहुल मारुती दोरगे, हेमंत शहा, कृष्णा वामन मानमोडे, संजय रामकृष्ण जाधव आणि त्यांचे इतर साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सुनिल जगन्नाथ आव्हाड (वय 56, रा. सोलापुर रोड, हडपसर, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन खुर्द येथील मिळकत देसाई ॲन्ड गायकवाड प्रमोटर्स ॲन्ड बिल्डर्स आणि सौ संगीता राजेंद्र झुरंगे या दोघांची एकत्रित मालमत्ता आहे. यासंदर्भात न्यायालयाने आरोपी यांना मनाई आदेश दिले आहेत. असे असतानाही 22 जुलै रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास आरोपी दोरगे याच्या सांगण्यावरून ठेकेदार हेमंत शहा याने फिर्यादी काम करत असलेल्या वरील कंपनीच्या वॉचमनवर दहशत निर्माण करून तो राहत असलेल्या कोठीचे कुलूप तोडून नुकसान केले. तसेच जबरदस्तीने मिळकतीमध्ये प्रवेश केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare