नोकरी टिकविण्यासाठी शाळा समिती अध्यक्षांची महिलेकडे शरीर सुखाची मागणी

194

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – नोकरी टिकवण्यासाठी प्राध्यापिकेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शाळा समिती अध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पिंपरी येथील भारतीय जैन संघटना शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मोठा राजकीय हस्तक्षेप करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी शाळा समिती अध्यक्ष अरुण नहार (वय ५०, रा. औध), एस डी कदम (वय ५२, रा. वाघोली), बी बी चौघुले (वय ६३, रा. चतुशृंगी) आणि कोचर (वय ५२, रा. वडगाव शेरी) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ४५ वर्षीया पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नहार हा पिंपरी येथील भारतीय जैन संघटना शाळेच्या समिती अध्यक्षपदी आहे. तर इतर शाळेतील शिक्षक, कर्मचारी आहेत. पिडीत महिला या शाळेत कामाला होत्या. दरम्या, नहार यांची शाळा समिती अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर वेळोवेळी नहार ही वेगवेगळ्या मागणी करुन त्रास देऊ लागला. तर इतरही नहार याला साथ देत होते.

नोकरी टिकवायची असल्यास नहार सांगतात तसे करा असे यांनी पिडीत महिलेस सांगितले. मात्र पिडीक महिलेने नहार यांच्या चुकीच्या मागण्या पुर्ण करण्यास नकार दिला. नहार याने वारंवार अश्लील बोलून विनयभंग केला. नहार याने चिडून वेगवेगळे आरोप लावून कामावरून काढण्यात आल्याचे पिडीत महिेलेने म्हटले आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.