नोकरी करून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेला क्रूर वागणूक देणा-या सासरच्या चौघांवर गुन्हा

27

चिखली, दि. २६ (पीसीबी) – नोकरी करून पैसे आण अथवा तुझ्या वडिलांकडून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेला क्रूरपणाची वागणूक देत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच सास-याने विवाहितेचा विनयभंग केल्याची फिर्याद विवाहितेने दिली आहे. त्यानुसार सासरच्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती, सासू, सासरे, जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत विवाहितेने शनिवारी (दि. 24) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 16 फेब्रुवारी ते 13 जुलै 2020 या कालावधीत कृष्णानगर, चिंचवड येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी विवाहितेला तू नोकरी करून पैसे घेऊन ये, नाहीतर तुझ्या वडिलांकडून पैसे व वानवळा घेऊन ये. तरच आमच्या घरात रहा नाहीतर तू येथून निघून जायचे, असे म्हणत विवाहितेला त्रास दिला. सास-याने विवाहितेशी गैरवर्तणूक करून तिचा विनयभंग केला. सर्व आरोपींनी विवाहितेला शिवीगाळ करून मानसिक, शारीरिक, आर्थिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare