नेहरू गेले, त्यांच्या पिढ्या गेल्या, मात्र काळाबाजार सुरूच – उध्दव ठाकरे  

178

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – आम्ही सत्तेत आल्यावर काळा बाजार करणाऱ्यांना फासावर लटकवू, असे आश्वासन  भारताचे दिवंगत पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी दिले होते.  त्या घोषणेचे काय झाले? पंडित नेहरू गेले, त्यांच्या पिढ्या गेल्या मात्र काळा बाजार करणारे अजूनही देशात आहेतच, असे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.

नेहरूंच्या घोषणेनंतर जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारला की, तुम्ही काळा बाजार वाल्यांना फासावर लटकवणार होतात त्याचे काय झाले? तेव्हा नेहरू म्हटले की हो ती घोषणा केली होती. मात्र काळा बाजार कोण करतंय यावर आमचे लक्ष आहे. माझी ही जुमलेबाजी होती, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.   नेहरूपासून  या घोषणा सुरू झाल्या. गरीबी हटावपासूनच्या घोषणा आल्या त्या अच्छे दिन पर्यंत सुरूच आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही जुमलेबाजी केली जात आहे. जुमलेबाजीने देशाचा घात केला आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हणाले.

आणीबाणी आली आहे, अशी जी काही कुजबूज देशात सुरू आहे, त्याला काही अर्थ नाही. जनता सार्वभौम आहे. जनतेने आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधींनाही नाकारले, तेव्हाही चर्चा अशी होती की इंदिरा गांधींना पर्याय नाही तेव्हाही इंदिरा गांधींसमोर कोणीही नव्हते, तरीही देशाने त्यांना नाकारले. त्यामुळे आणीबाणी आहे असे काही म्हणू नका. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी जनता समर्थ आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.