नेहरूनगर येथे ज्वेलर्सचे दुकान फोडले; रविवारी सकाळी प्रकार उघडकीस

30

भोसरी,(पीसीबी) दि. २७ ९नेहरूनगर पिंपरी येथे अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडले. दुकानातून चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना आज (रविवारी, दि. 27) सकाळी उघडकीस आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी मधील नेहरूनगर येथे संतोषी माता मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच्या बाजूला दुर्गा ज्वेलर्स हे दुकान आहे. रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर अर्ध्यापर्यंत उचकटून दुकानात प्रवेश केला.

दुकानातून चोरट्यांनी दहा ते बारा हजारांचे चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare