नेहरूनगरमध्ये मोक्कांतर्गत कारवाईतील गुन्हेगारांची दहशत; तक्रारदाराला बेदम मारहाण

2001

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरीतील नेहरूनगरमध्ये मोक्कांतर्गत गुन्ह्यातील ३ ते ५ गुन्हेगारांनी फिर्याद मागे घेत नसल्याच्या कारणावरून तक्रारदाराला मारहाण केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार शुक्रवारी (दि. ७) मध्यरात्रीच्या सुमारास घडला. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी लखन रघुनाथ पवार (वय ३०, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मनोज विटकर (वय २६, साईमंदीर, नेहरूनगर, पिंपरी), हर्षल उर्फ गबऱ्या पवार (वय २७, विजयप्रभा हौसिंग सोसायटी, पिंपरी) यांच्यासह त्यांच्या इतर दोन साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींवर या अगोदर मोक्कांतर्गत कारवाई कऱण्यात आली होती. त्यानंतर या गुन्ह्यातून त्यांची सुटका करण्यात आली होती. विषेश म्हणजे, ही फिर्यादी लखन यांनी दिली होती. आरोपी लखन यांना मोक्कांतर्गतची फिर्याद मागे घेण्याची मागणी करत होते. मात्र लखन यांनी फिर्याद मागे घेत नव्हते. त्यामुळे गुन्हेगारांनी नेहरूनगर राजीव गांधी परिसरातील महिलांना त्रास द्यायला सुरूवात केली. काल (शुक्रवारी) मध्यरात्री फिर्यादी यांना गुन्हेगारांनी ३ ते ४ जणांच्या साहाय्याने जबर मारहाण केली.

दरम्यान, आऱोपी मारहाण करून परार झाले आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.