नेहरुनगरमध्ये बघुन घेण्याची धमकी देवून तरुणीचा विनयभंग

137

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – “तु मला खुप आवडतेस, तु माझ्या बरोबर फिरायला चल माझ्याकडे खुप पैसा आहे तु जर माझ्या बरोबर फिरायला आली नाहीस तर तुला आणि तुझ्या घरच्यांना बघुन घेईन”, अशी धमकी देवून एका तरुणाने तरुणीचा विनयंभ केला. ही घटना सोमवारी (दि.८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नेहरुनगर येथील राजीवगांधी शाळेच्या शेजारी असलेल्या सार्वजनिक सौचालयाजवळ घडली.

याप्रकरणी पीडित १८ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शशीकांत आशीष गायकवाड (वय १८, रा. प्रज्ञा विकास हौसिंग सोसायटी, बिल्डिंग क्र.४, रुम क्र.६०९) या तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पीडित १८ वर्षीय तरुणी ही नेहरुनगर येथील राजीवगांधी शाळेच्या शेजारी असलेल्या सार्वजनिक सौचालयात सौचास चालली होती. यावेळी आरोपी शशीकांत याने तरुणीचा हात पकडून “तु मला खुप आवडतेस, तु माझ्या बरोबर फिरायला चल माझ्याकडे खुप पैसा आहे तु जर माझ्या बरोबर फिरायला आली नाहीस तर तुला आणि तुझ्या घरच्यांना बघुन घेईन”, अशी धमकी देवून विनयंभ केला. आरोपी शशीकांत याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे तपास करत आहेत.