नेहरुनगरमध्ये तिघा टोळक्यांनी कोयत्याने वार करुन तरुणाला लुटले

688

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – दुचाकीवरुन आलेल्या तिघा टोळक्यांनी पादचारी तरुणावर कोत्याने वार करुन लुटले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१०) रात्री अकराच्या सुमारास नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडीयम जवळ घडली.

कमलेश चव्हाण (वय २१, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) असे कोयत्याचे वार होऊन लुटण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने पिंपरी पोलिस ठाण्यात दुचाकीवरुन आलेल्या तिन अज्ञात हल्लेखोरांविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी चव्हाण हा चिंचवड येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी जेवण करुन नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडीयम जवळून पायी संत तुकारामनगर येथील त्याच्या घरी निघाला होता. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी कमलेश याच्यावर कोत्याने वार करुन त्यांच्या जवळील रोख दीड हजार रुपये आणि साडेसहा हजार रुपयांचा एक मोबाईल जबरदस्तीने हिस्कावून फरार झाले. पिंपरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल बढे तपास करत आहेत.