नेहरुनगरमध्ये टेम्पोच्या धडकेत जखमी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

110

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत एका ५४ वर्षीय पादचारी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार (दि.२७ जुलै) सायंकाळी साडेसातच्या सुमारास नेहरुनगर सिग्नल येथे घडला होता. तर मंगळवारी जखमी इसमाचा मृत्यू झाला.

नागनाथ नारायण गंडी (वय ५४, रा कामगारनगर, खराळवाडी) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा लक्ष्मण गंडी (वय २६, रा. कामगारनगर,खराळवाडी, पिंपरी) याने पिंपरी पोलिस ठाण्यात टेम्पो चालक सुर्यकांत विठ्ठल जाधव (रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी लक्ष्मण गंडी यांचे वडिल नागनाथ गंडी हे भोसरी एमआयडीसी येथील त्यांचे काम आटपून पायी खराळवाडी येथील त्यांच्या घराकडे निघाले होते. नेहरुनगर सिग्नल येथे पोहचले असता भरधाव टेम्पोचालक सुर्यकांत जाधव याने नागनाथ यांना जोरदार ठोकर मारली यामध्ये नागनाथ गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. आरोपी टेम्पो चालक जाधव याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.