नेहरुनगरमध्ये चाकूचा धाक दाखवून कार पळवली

281

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – चाकूचा धाक दाखवून दोघा हल्लेखोरांनी एक कार, मोबाईल आणि इतर महत्वाची कागदपत्रे असा एकूण २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरुन नेला आहे. ही घटना रविवारी (दि.५) रात्री अकराच्या सुमारास पिंपरीतील नेहरुनगरमध्ये असलेल्या संतोषीमाता चौकात घडली.

आजिनाथ नागरगोजे (वय ३२, रा. देहुगाव) असे चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी दोन अज्ञात हल्लोखोरांविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी आजिनाथ हे त्यांच्या  वॅगनर कारने पिंपरीतील नेहरुनगरमध्ये असलेल्या संतोषीमाता चौकातून जात होते. यावेळी दोन अज्ञात हल्लेखोर त्यांच्या कार जवळ आले. त्यांनी आजिनाथ यांना चाकूचा धाक दाखवून कारच्या खाली उतरण्यास सांगीतले तसेच त्यांच्या जवळी मोबाईल, वॅगनर कार आणि काही महत्वाची कागदपत्रे असा एकूण २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरुन नेला. सहाय्यक पोलिस निरीक्षक एन.डी.वाघमारे तपास करत आहेत.