नेमकी लग्नातच गेली लाईट आणि नवरींची झाली अदलाबदली…?

107

मध्यप्रदेश : लोडशेडिंग ही भारतातील एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना सांमोरं जावं लागतं. पण या सगळ्याचा लग्नावर आणि जीवनसाथीवर काही परिणाम होऊ शकतो का? गोंधळला असाल तर थोडं स्वत: ला सावरा. अन् ही घटना वाचा… मध्य प्रदेशमधल्या उज्जैन जिल्ह्यात वीज गेल्याने चक्क नवरींची अदलाबदल झाल्याचं समोर आलं आहे.लाईट गेल्याने झालेल्या अंधारामुळे लग्नसमारंभात वधू बदलली झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची सध्या फक्त परिसरातच नाही तर देशभर चर्चा होतेय.

मध्य प्रदेशमधल्या उज्जैनमध्ये वीज गेल्याने चक्क नवरींची अदलाबदल झाल्याचं समोर आलं आहे.लाईट गेल्याने झालेल्या अंधारामुळे लग्नसमारंभात वधू बदलली झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची सध्या फक्त परिसरातच नाही तर देशभर चर्चा होतेय. उज्जैन जिल्ह्यातील इंगोरिया पोलीस ठाण्याच्या अस्लाना गावात रमेशलाल यांच्या तीन मुली आणि एका मुलाचे लग्न होतं. रविवारी त्यांच्या दोन मुली निकिता आणि करिश्मा यांचा डांगवाडा इथल्या भोला आणि गणेश या दोघांशी विवाह झाला. हे दोन ही तरुण वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत. त्यांची वरात काढण्यात आली होती. वरात गावात फिरून आली तेव्हा रात्रीचे साडे 11 वाजले होते. मग माता पूजना करताना दोन्ही नववधूंनी वरांचे हात धरून पूजा केली.

या पुजेच्या वेळी निकिताने गणेश आणि करिश्माने भोलाचा हात धरला होता. पण जेव्हा साडे बाराच्या सुमारास लाईट आली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. तेव्हा नवरींची अदला बदल झाली बदल जाली होती. ही चूक लक्षात येता. घरची मंडळी चक्रावून गेली आणि त्यांनी यावर काय उपाय काढता येईल याचा विचार केला. मग त्यावर तोडगा काढण्यात आला. पहाटे पाच वाजताच्या सुमारास झालेल्या पुजेदरम्यान ही गोष्ट दुरुस्त करण्यात आली. आपल्या खर्या साथीदाराच्या सोबत आयुष्यभराच्या अनाभाका घेण्यात आल्या. त्यांची सप्तपदी पूर्ण करण्यात आली.

लाईटमुळे जोडीदारांची अदलाबदल झाल्याची ही दुर्मिळ घटना सध्या अनेकांच्या आश्चर्याचा विषय बनली आहे. या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.