नेता, निती आणि रणनितीचा विरोधकांकडे अभाव – भाजप

77

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत व्हिजन २०२२ सादर केला. तसेच विरोधक हे हताश आणि हतबल झाले आहेत, असा टोलाही लगावत आम्ही पुनरागमन करणार असल्याचा दावा  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. विरोधकांकडे न नेता आहे, न निती आणि रणनितीचाही अभाव आहे. त्यामुळे विरोधक हताश झाले आहेत.  त्यामुळेच त्यांनी नकारात्मक राजकारण सुरू केले आहे, असा आरोप त्यांनी केला.