नॅनो कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

1

सांगवी, दि. २३ (पीसीबी) – दुचाकीवरून जात असताना एका नॅनो कारने दुचाकीला समोरच्या बाजूने जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 21) दुपारी बारा वाजता सांगवी फाट्यावरील ढोरे पाटील सबवे जवळ घडली.

सुनीता बाळकृष्ण जाधव (रा. साई चौक, नवी सांगवी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. याबाबत सुनीता यांचा मुलगा शिवप्रसाद बाळकृष्ण जाधव (वय 28) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नॅनो कारचालक महिला ऋतू मनीष गुप्ता (रा. पिंपळे सौदागर) हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आई मयत सुनीता सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास सांगवी फाट्याकडून औंध, पुणे बाजूकडे दुचाकी (एम एच 14 / जी एफ 7159) वरून जात होत्या. त्यावेळी ढोरे पाटील सबवे जवळ त्यांच्या दुचाकीला आरोपी ऋतू गुप्ता हिच्या नॅनो कारने (एम एच 12 / पी एच 0604) समोरून जोरदार धडक दिली. त्यामध्ये अनिता गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare