नुसरत जहाँची दुर्गापूजा; उलेमांनी घेतला आक्षेप

196

देवबंद, दि. ७ (पीसीबी) – तृणमूल काँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दुर्गापूजेनिमित्त कोलकात्यातील दुर्गाभवन येथे पती निखिल जैन यांच्यासोबत कपाळाला कुंकू लावून उपस्थित राहिलेल्या नुसरतवर मुस्लीम धर्मगुरू नाराज झाले आहेत. जर नुसरतला धर्माबाहेरील काम करायचे असेल, तर तिने आधी आपले नाव बदलले पाहिजे,असे देवबंदी उलेमांचे म्हणणे आहे. नुसरतने दुर्गाभवनात दुर्गापूजेत भाग घेतल्यानंतर सोशल मीडियावर ती ट्रोल झाली होती.

खासदार नुसरत जहाँने दुर्गा पूजेत भाग घेतल्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर तिच्यावर चौफेर टीका सुरू झाली होती. फोटोमध्ये ती बंगाली साडी आणि मेकअपमध्ये पूजा करताना दिसत होती. अनेकांनी तिच्यावर टीका करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

WhatsAppShare