नीरव मोदीला दिलासा नाहीच; लंडनमधील न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

220

लंडन, दि. १२ (पीसीबी) – पंजाब नॅशनल बँकेला ठकवणारा हिरे व्यापारी नीरव मोदीला सलग चौथ्यांदा लंडनमधील न्यायालयाने दणका दिला. लंडनमधील हायकोर्टाने बुधवारी पुन्हा एकदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळून लावला असून त्याला आता आणखी काही काळ तुरुंगात रहावे लागणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून नीरव मोदी लंडनमध्ये पळाला होता. मार्च महिन्यात नीरव मोदीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तुरुंगातून सुटका व्हावी, यासाठी नीरव मोदीच्या वतीने तीन वेळा जामीन अर्ज करण्यात आला. मात्र, लंडनमधील न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. अखेर त्याने ब्रिटनमधील हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला. बुधवारी दुपारी नीरव मोदीच्या याचिकेवर सुनावणी झाली. जामिनासाठी नीरव मोदीच्या वतीने प्रकृतीचे कारण देण्यात आले होते.

WhatsAppShare