नीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस

183

मुंबई, दि. १० (पीसीबी) – पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींना गंडा घालून पळालेल्या नीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

पूर्वी दीपक मोदी असे नीरव मोदीच्या बहिणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरपोलने नीरव मोदीची बहिण पूर्वी दीपक मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. या रेड कॉर्नर नोटीसमध्ये इंटरपोलने १९२ सदस्य देशांना याबाबतची सूचना दिली आहे की ही व्यक्ती कुठेही आढळली तर तिला अटक करण्यात यावी किंवा ताब्यात घेण्यात यावे. त्यानंतर प्रत्यार्पण कारवाई सुरू केली जाईल. इंटरपोलने जारी केलेल्या नोटीसनुसार पूर्वीला इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषा येतात. ती बेल्जियमची नागरिक आहे.