नीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश

40

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पसार झालेल्या नीरव मोदीचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवार) आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.