निसर्गाचा माणसानेच मुडदा पाडला महापुरावर बोलताना भिडेंना अश्रु अनावर

138

सांगली, दि. १३ (पीसीबी) – कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापुराने थैमान घातले आहे. अनेक घर पाण्याखाली गेली. गाव बुडाली, लोकांना स्थलांतरित व्हाव लागल. अनेक जनावर वाहून गेली. आता हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत आहे. पाणी ओसरु लागल आहे. मात्र आठवडाभर सांगली आणि कोल्हापूरकरांनी निसर्गाच रौद्ररुप काय असत ते अनुभवल. पाणी ओसरु लागल्यानंतर ज्या पुढे वाढून ठेवलेल्या समस्या आहेत त्या काय काय आहेत हे जाणून घेण्यासाठी संभाजी भिडे यांनी सांगलीचा दौरा केला.

यावेळी ते म्हणाले कि, लवासासारख्या प्रकल्पांमुळे निसर्गाचा मुडदा पडला आहे. निसर्गाचा माणसानेच मुडदा पाडला आहे त्यामुळे त्याचे रौद्ररुप पाहण्यास मिळते. २००५ पेक्षा शंभरपटीने भीषण स्थिती सांगली कोल्हापुरात अनुभवयाला मिळाली. फक्त लवासाच नाही गावोगावी असाच निसर्गाचा मुडदा पडतो आहे. आता आईच्या मायेने सगळ सावरायला हवे असे बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.