निवृत्तीनंतर सीताराम कुंटे आता ‘या’ महत्त्वाच्या पदावर

121

मुंबई, दि.०१ (पीसीबी) : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे मंगळवारी निवृत्त झाले. मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर कुंटे यांची तत्काळ मुख्य सचिवालयात प्रधान सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. राज्य सरकारने सीताराम कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी केंद्राकडे केली होती. मात्र, ती मागणी मान्य झाली नाही. तत्पूर्वी कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल अशी चर्चा होती. सूत्रांच्या माहितीनुसार १९८६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले चक्रवर्ती यांना मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. नवीन मुख्य सचिव नेमायचा की त्यांनाच पूर्णवेळ मुख्य सचिवपद द्यायचे यावर लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील.

दरम्यान, फेब्रुवारी अखेरीस म्हणजे आणखी तीन महिन्यानंतर देबाशिष चक्रवर्ती निवृत्त होणार आहे. तर दुसरीकडे कुंटे हे आता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार आहेत. यापूर्वीही अजोय मेहता यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागारपदी नेमणूक केली होती.

WhatsAppShare