निवडणूक विजयांनतर फटाके फोडू नका – अरविंद केजरीवाल

188

नवी दिल्ली,दि.११(पीसीबी) – निवडणूक विजयानंतर फटाके फोडू नयेत, असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. हाती आलेल्या कलानुसार दिल्लीत ‘आम आदमी पक्षा’ने तिसऱ्यांदा दिल्ली मध्ये गड राखला आहे.

फटाके फोडून दिल्लीत प्रदुषणात भर पडू नये, म्हणून केजरीवालांनी आपच्या कार्यकर्त्यांना या सूचना दिल्या आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांच्या या सूचनेचं पालन केल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, मुख्य लढत असणाऱ्या आप आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीसाठी ६७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हॅट्रीक करत सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा भाजप करत आहे.

WhatsAppShare