निवडणूक प्रक्रियेतील सोशल मीडियाचा हस्तक्षेप रोखणार – रविशंकर प्रसाद

93

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचा दुरुपयोग करून  निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात आहे. याची गंभीर दखल घेत  अशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मना किंवा तत्सम गोष्टींना  कधीही परवानगी दिली जाणार  नाही, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले  आहे.

अर्जेंटिनातील सलटा येथील जी-२० डिजिटल इकॉनॉमी मिनिस्ट्रिअलच्या बैठकीत बोलताना रविशंकर  म्हणाले की,  भारतातील लोकशाही प्रक्रियेच्या शुद्धतेशी कधीही तडजोड केली जाणार नाही. तसेच भारताच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये अडथळे आणणाऱ्यांना कडक शासन केले जाईल, असे मी वचन देतो.

सोशल मीडियातील माहितीचा निवडणूक प्रक्रियेमध्ये दुरुपयोग होत आहे. त्यामुळे अशा सोशल मीडियातील माध्यमांना कधीही परवानगी दिली जाणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियाचा असा दुरुपयोग करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे याचा असा दुरुपयोग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.