निवडणुकिच्या तोंडावर सपाचे अखिलेश यादव यांना मोठा धक्का

47

लखनऊ, दि. १९ (पीसीबी) – उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसलाय. मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

अपर्णा यादव यादेखील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे गायप्रेमी आहेत, असं त्यांनी स्वत: एका मुलाखातीत वक्तव्य केलं होतं. “गाई वंश हा आपल्या सनातन परंपरा आणि संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. याला राजकारणाशी जोडणं अजिबात योग्य नाही. माझ्या मनात मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्याबद्दल आदर आहे. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत म्हणून नव्हेतर, ते मोठे महंत आहेत म्हणून!”, असंही त्यांनी मुलाखतीत म्हटलं होतं.

दरम्यान, अपर्णा यांनी योगी सरकारच्या विकासकामांचेही अनेकदा कौतूक केलं आहे. कोरोना काळात योगी सरकारनं केलेल्या कामाचं भरभरून कौतूक केलं होतं. “एक सामान्य नागरिक म्हणून मला भाजप सरकारचे अनेक निर्णय आवडले आहेत. भाजप सरकारनं जनहिताचं अनेक चांगले निर्णय घेतले जे योग्यही ठरले आहेत”, असं अपर्णा यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटलंय.