निर्भयाच्या दोषींना १ फेब्रुवारीला फासावर लटकवणार

106

दिल्ली, दि.१७ (पीसीबी) – निर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषींना फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. या संदर्भातल दिल्ली कोर्टाने नवे डेथ वॉरंट जारी केले आहे. दिल्ली कोर्टाने आधी दिलेल्या डेथ वॉरंटनुसार २२ जानेवारीला निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यात येणार होते. मात्र डेथ वॉरंटला आव्हान देण्यात आले ज्यानंतर २२ तारखेचे डेथ वॉरंट रद्द करण्यात आले होते. आता दिल्ली न्यायालयाने नवं डेथ वॉरंट जारी केली आहे. या डेथ वॉरंटनुसार फेब्रुवारीला निर्भयाच्या दोषींना फाशी दिली जाणार आहे. सकाळी ६  वाजता ही फाशी दिली जाणार आहे.