निरंकारी सदगुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांना सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक विभूती पुरस्कार घोषित

17

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – अमेरिकेतील मानवतेचा बहुपक्षीय तसेच विश्वस्तरीय विकास साधण्यासाठी समर्पित संस्था ‘वुई केअर फॉर हयुमॅनिटी’ (WeCareForHumanity) च्या वतीने निरंकारी सदगुरु माता सविंदरहरदेव जी महाराज यांना सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक विभूति पुरस्कार २०१८ ने सम्मानित करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
या पुरस्काराची घोषणा सदर संस्थेच्या अध्यक्षा व जगातील महान विभूतींना सन्मानित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या संस्थेच्या पुरस्कार समितीच्या अध्यक्षा तसेच सूलो राज्याच्या राजकुमारीमारिया टोरेस यांनी केली.
दरम्यान, राजकुमारी मारिया टोरेस यांनी सदगुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांना हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या संस्थेने कोलकाता येथे येत्या २८ – २९ जुलै २०१८ रोजी आयोजित शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी आमंत्रित केले आहे.