नितेश राणेंचे निलंबन करा; लेखणी बंद आंदोलन करु अभियंत्यांचा ईशारा

315

मुंबई, दि ६ (पीसीबी) – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेंडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांच्या १८ समर्थकांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कणकवली येथे उपरस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेवरून गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेंडेकर यांच्यावर चिखल ओतून त्यांना धक्काबुक्की केली होती. .

नितेश राणेंनी केलेल्या चिखलफेकीचा निषेध म्हणून सोलापुरात सार्वजनिक बांधकाम विभाग, जसधारण विभाग, कृष्ण खोरे महामंडळचे अभियंते आणि कर्मचारी आज एकत्र जमून घडवून आणलेल्या घटनेचा निषेध नोंदवला आहे. मंत्र्यांच्या कारवाईच्या आश्वासनाने दोन दिवसांचे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. केवळ आज निषेध आंदोलन केलंय , पुढचा टप्पा सोमवारी लेखणी बंद आंदोलन आहे. जर नितेश राणे यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास बेमुदत आंदोलना करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

 

WhatsAppShare