घरगुती कामासाठी बाहेरगावी गेलेल्या निगडीतील एका कुटूंबाच्या घरातून तब्बल ८ लाख २३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीट्यांनी लंपास केले आहेत. ही घटना २४ मार्च ते ३३ एप्रिल दरम्यान निगडीतील प्राधिकरण भागात घडली.

राजकुमार गंगाभीषण मित्तल (रा. प्राधिकरण, निगडी) यांच्या घरात ही चोरी झाली आहे. याप्रकरणी त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार मित्तल हे निगडी प्राधिकरण भागात त्यांच्या कुटूंबासोबत राहतात. ते त्यांच्या कुटूंबासह शनिवारी २४ मार्चला ते मंगळवारी ३ एप्रिल दरम्यान घरगुती कामासाठी बाहेरगावी गेले होते. ते गावावरून मंगळवारी ३ एप्रिल ला परत आले. यावेळी त्यांच्या घरातील बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आणि लोखंडी कपाट उघडे होते. त्यांनी कपाट तपासले असता कपाटातील ८ लाख २३ हजार रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर त्यांनी ततडीने निगडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.