निगडी प्राधिकरणमध्ये सव्वा दोन लाखांची घरफोडी

65

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – निगडी प्राधिकरण येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दोन लाख 14 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना 19 जून रोजी सकाळी उघडकीस आली असून याबाबत तब्बल दहा दिवसानंतर 29 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुलाबराव भागुजी थरकुडे (वय 66, रा. ज्ञानेश्वर उद्यान शेजारी, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी रात्री आठ ते 19 जून सकाळी साडेआठ या कालावधीत फिर्यादी थरकुडे यांचे घर कुलूप लाऊन बंद होते. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा कट करून घरात प्रवेश केला. घरातील किचनमध्ये असलेल्या लोखंडी व लाकडी कपाटामधून एक लाख 10 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि एक लाख चार हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare