निगडी, चाकण, चिखली मधून तीन दुचाकी, दिघी मधून कार चोरीला

1

चाकण,दि.०५(पीसीबी) – निगडी, चाकण आणि चिखली परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी वाहने चोरून नेली. तर दिघी परिसरातून एका कार चोरून नेली आहे. याबाबत सोमवारी (दि. 4) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वसंत लक्ष्मण पवार (वय 51, रा. नखातेवस्ती, रहाटणी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / झेड 6170) निगडी येथील मधुकर पवळे ब्रिजखालून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

लक्ष्मण तानाजी कोळेकर (वय 25, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोळेकर यांची 18 हजारांची दुचाकी (एम एच 14 / जी ई 0994) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली.

जयपाल सोमनाथ भालेराव (वय 26, रा. तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भालेराव यांची 40 हजारांची दुचाकी (एम एच 14 / जी टी 7675) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या गेट समोरून चोरून नेली.

मुसा इस्माईल इनामदार (वय 48, रा. तापकीरनगर, देहूफाटा आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इनामदार यांची एक लाख 25 हजारांची तवेरा कार (एम एच 12 / के एन 9022) अज्ञात चोरट्यांनी मोशी-आळंदी रोड वरील साखरे महाराज मठाजवळून चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.  

WhatsAppShare