निगडीत स्कुल बसचालकाचा अल्पवयीन विद्यार्थ्यीनीवर लैंगिक अत्याचार; विद्यार्थ्यीनी गरोदर राहिल्याने प्रकार उघड

848

निगडी, दि. २२ (पीसीबी) – जबरदस्ती शारीरीक संबंध प्रस्थापीत करुन एका स्कुल बसचालकाने त्याच्या बसमधून शाळेला जाणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ही घटना मार्च २०१८ दरम्यान घडली.

याप्रकरणी पिडीत १६ वर्षीय मुलीने निगडी पोलिसात २७ वर्षीय स्कुल बसचालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी स्कुल बसचालकाला अटक केली आहे.

निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्कुल बसचालकाने मार्च २०१८ दरम्यान त्याच्या बसमधून शाळेला जाणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर निगडी येथील पिडीतेच्या घरी जावून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापीत केले. यामुळे पिडीत मुलगी गरोदर राहिली आणि तीने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. पिडीतेने स्कुल बसचालका विरोधात निगडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. निगडी पोलिसांनी आरोपी बसचालकाला अटक केली आहे.