निगडीत सायकल घेऊन दिली नाही म्हणून मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

114

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – वडिलांनी सायकल आणून दिली नाही म्हणून बारा वर्षाच्या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शनिवारी (दि. ७) सायंकाळच्या सुमारास निगडीतील अप्पूघर परिसरात घडली.

इशांत बलबीर शर्मा (वय १२, रा. सिद्धीविनायकनगरी, अप्पूघर, प्राधिकरण) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इशांत याला त्याचे वडील सायकल आणून देणार होते. मात्र कामाच्या व्यापामुळे सायकल आणणे शक्या झाले नाही. शनिवारी सायंकाळी सायकल वरून इशांत रंगवला होता. ते बेडरुममध्ये गेला. बराच वेळ होऊनही तो बाहेर येत नसल्याने दरवाजा तोडला असता इशांत याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. देहूरोड पोलिस तपास करत आहेत.