निगडीत विवेक पोंक्षे यांना वा. ना. अभ्यंकर गुरूगौरव पुरस्कार प्रदान

96

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – निगडी, प्राधिकरणातील मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात स्पृहणीय कार्य केल्याबद्दल  १ लाख रूपयांचा वा. ना. अभ्यंकर गुरूगौरव पुरस्कार पुणे ज्ञान प्रबोधिनीच्या शिक्षण विभागाचे प्रमुख विवेकराव पोंक्षे यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचा वर्धापनदिन व गुरूपोर्णिमेचे औचित्य साधून हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त किरण गिते उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यवाह यशवंत लिमये, वा.ना. अभ्यंकर, सुभाष देशपांडे, मनोज देवळेकर, ज्ञानेश्वर सावंत प्राचार्य प्रज्ञा पाटील, सुभाष गदादे, विवेक कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी १० दहावी मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथम आलेला अथर्व कुलकर्णी याचा सत्कार करण्यात आला. विवेकानंद केंद्र विद्यालय, दिन्रुगड (आसा) चे रवी सावदेकर यांना पुरस्कार देण्यात आला. ५१ हजार रूपयांचा ‘समाजशिक्षक’ पुरस्कार मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर यांना देण्यात आला. तर बिकट परिस्थितीत मुलांना संस्कारशील बनवून त्यांना उत्तम नागरिक बनविणाऱ्या माता सुहासिनी जोशी यांना ‘धन्य राधामाता’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

रामदास जायकर यांनी वानराव अभ्यंकर यांचा सत्कार केला. ज्ञानप्रबोधिनीचे प्राथमिक मराठी विभाग प्रमुख शिवराज पिंपुर्डे, आदित्य शिंदे यांनी संयोजन केले. राजश्री मराठे यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानप्रबोधिनीचे केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर यांनी आभार मानले.