निगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

474

निगडी, दि. १४ (पीसीबी) – पतीसह सासरच्या मंडळींनी देलेल्या शारीरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेने राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना सोमवार (दि.३० जुलै) निगडी ओटास्कीम येथील सिध्दीविनायक सोसायटी मध्ये असलेल्या फ्लॅट क्र.१०३ येथे घडली.

निशा सागर जाधव (वय २०, रा. निगडी ओटास्कीम, सिध्दीविनायक सोसायटी, फ्लॅट क्र.१०३) असे विष प्राशन करुन आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडिल रजाक गायकवाड (वय ४८, रा. खानापुर फाटा, एमआयडीसी, परभणी शहर) यांनी निगडी पोलिस ठाण्यात पती सागर बबन जाधव आणि जाधव कुटूंबातील इतर दोघांवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रजाक गायकवाड यांची मुलगी निशा हिचे सागर जाधव सोबत ११ सप्टेंबर २०१६ मध्ये विवाह झाला होता. यादरम्यान ती आपल्या पती सागरसोबत निगडी येथील सासरी राहत होती. यावेळी निशाला सासरकडच्या मंडळींनी माहेरुन सोन्याची अंगठी आणण्यास सांगून तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून निशाने तिच्या निगडीतील राहत्या घरी शुक्रवारी (दि.२९ जुलै) रात्री दोनच्या सुमारास विष प्राशन करुन आत्महत्या केली. याप्रकरणी पतीसह सासरकडच्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक टि.व्ही.मोरे तपास करत आहेत.