निगडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू

98

भोसरी, दि. २७ (पीसीबी) –  विजेच्या खांबाचा शॉक लागून एका ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २६) रात्री दहाच्या सुमारास निगडी प्राधिकरणातील सेक्टर २२ मध्ये घडली.

हरीओम विनायक नराल (वय ९, रा. सेक्टर नंबर २२, प्राधिकरण, निगडी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, हरिओम याला रात्री विजेच्या खांबाचा जोरात शॉक बसला. यामध्ये तो गंभीर भाजून जखमी झाला. त्याला उपचारासाठी तात्काळ यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मात्र शॉक कसा लागला याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही.