निगडीत लहान मुलांची भांडणे सोडवायला गेलेल्या महिलेचा विनयभंग

778

निगडी, दि. ११ (पीसीबी) – लहान मुलांची भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.१०) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पीडित ३७ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार सौदागर उत्तमराव कातकडे (वय ३८, गुरुदत्त हौसिंग सोसायटी, राहुलनगर, निगडी) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास राहुनगर परिसरात काही लहान मुले भांडण करत होते. भांडणे विकोपाला जाऊनये म्हणून पीडित महिलेने मध्यस्ती करुन भांडणे सोडवली आणि एका मुलाच्या हातातील पट्टा हिस्कावून घेतला. यावर तेथे उपस्थि असलेल्या मुलाच्या वडिल सौदागर यांनी महिलेला अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन विनयभंग केला. निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सौदागर याला अटक करण्यात आली आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.