निगडीत भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जखमी

324

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि.७) सकाळी साडेआठच्या सुमारास निगडी येथे घडली.

कचरु श्रीपती डोळसे (रा. रुपीननगर, तळवडे) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा आकाश डोळसे (वय २६) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कचरु डोळसे हे शुक्रवारी (दि. ७) सकाळच्या सुमारास दुचाकीवरुन दुर्गानगरच्या दिशेने जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने डोळसे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये डोळसे गंभीर जखमी झाले आहेत.  या प्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिस तपास करत आहेत.