निगडीत बेकायदा वृक्षतोडीच्या निषेधार्थ मानवी साखळी

190

पिंपरी, दि.२ (पीसीबी) – शहरातील बेकायदा वृक्षतोडीच्या निषेधार्थ निगडीतील टिळक चौकात  जागरूक नागरिक यांनी आज (रविवार) मानवी साखळी केली. यावेळी बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी जनजागृती करण्यात आली.  

यावेळी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, रोटरी कल्ब ऑफ वाल्हेकरवाडी, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन, संवाद युवा प्रतिष्ठान बिजलीनगर, ह्युमन सोसायटी सहगामी ग्रुप, निसर्ग मार्ग संस्था, सावरकर मंडळ निसर्गमित्र, जलदिंडी प्रतिष्ठान, थेरगांव सोशल फाउंडेशन या पर्यावरण प्रेमी संस्था सहभागी झाल्या होत्या.

बेकायदा झाडांची कत्तल रोखण्यासाठी ही मानवी साखळी करण्यात आली, असे गणेश बोरा यांनी सांगितले. यावेळी झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा, असा मजकूर लिहिलेले फलक घेऊन ज्येष्ठ नागरिक, तरूण मानवी साखळीत सहभागी झाले होते.