निगडीत बंद घरावर चोरट्याचा डल्ला; ३१ हजाराचा मुद्देमाल लंपास

109

भोसरी, दि. २५ (पीसीबी) – निगडीत बंद घराचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३१ हजार किंमतीचा मुद्देमाला चोरून नेला. हा प्रकार १५ ते १८ ऑगस्टच्या दरम्यान घडला.

या प्रकरणी वैशाली गणेष पाटील (वय ३५, रा. निगडी) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैशाली यांच्या घराच्या शेजारी जोसेफ देव सहाया यांचे घर आहे. जोसेफ यांचे घर १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान बंद होते. याचाच फायदा घेत चोरट्याने घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. घरात असलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ३१ हजार किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. देहूरोड पोलिस तपास करत आहेत.